जिममध्ये व्यायाम करताना EX इंडियन आर्मीच्या जवानाचा मृत्यू !

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन – सध्याच्या फॅनच्या जगामध्ये फिट रहायचे असेल तर आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे. त्यामुळे अनेकजण जिमचा पर्याय शोधतात. सिक्स पॅकच्या नादात जिम करताना अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारतीय नौदलात सेवा बाजावून सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिकाचा जिममध्ये व्यायाम करताना हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना काल्हेर येथे घडली.

भिवंडीत माजी नौदल सैनिकाचा जिममध्ये व्यायाम करताना हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. जितेंद्र शांताराम पाटील (वय-45 रा. काल्हेर) असे मृत्यू झालेल्या माजी नौदल सैनिकाचे नाव आहे. जितेंद्र पाटील हे लष्करी सेवा नियमानुसार 15 वर्षे भारतीय नौदलात सेवा बजावून निवृत्ती स्विकारली होती. त्यानंतर त्यांनी इंडियन मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी पत्करली होती.

मागील सहा वर्षापासून ते इंडियन मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होते. ते रोज सकाळी व्यायामासाठी ठाण्यातील जिममध्ये जात होते. नेहमीप्रमाणे जिममध्ये जाऊन ते व्यायाम करत असताना त्यांच्या छातीत कळ आली आणि त्यांना घाम फुटून जमिनीवर कोसळले. यावेळी जिममध्ये व्यायामासाठी आलेल्या तरुणांनी त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.