खुशखबर ! दहावी पास विद्यार्थ्यांना भारतीय नौसेनेत नोकरीची संधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही दहावी पास आहात आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय नौसेनेमध्ये ‘सेलेर’ या पदासाठी भरती होणार आहे. ६ मेपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

पात्रता – १० वी उत्तीर्ण, संगीत प्रमाणपत्र

अर्ज भरण्याची तारीख – ६ मे २०१९ ते १९ मे २०१९

अधिकृत वेबसाइट-joinindiannavy.gov.in

निवड प्रक्रिया – प्रारंभिक स्क्रीनिंग बोर्ड आणि अंतिम स्क्रीनिंग मार्ड मेरिटच्या आधारावर निवड केली जाईल. प्रारंभिक स्क्रीनिंग बोर्ड दोन टप्प्यात आयोजित केले जाईल.

निवड पद्धती
पहिल्या टप्प्यात, वय, शैक्षणिक पात्रता आणि संगीत प्रमाणपत्रांची तपासणी केली जाईल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अर्जदारांना दुसऱ्या टप्प्यात प्रवेश जाईल. यात शारीरिक फिटनेस चाचणी आणि वैद्यकीय तपासणी केली जाईल. प्रारंभिक स्क्रीनिंग बोर्ड ६-१० जुलै २०१९ दरम्यान होईल.

जे उमेदवार प्रारंभिक स्क्रीनिंग बोर्ड उत्तीर्ण होतील त्यांना अंतिम प्रारंभिक मंडळात प्रवेश मिळेल. त्यासाठी त्यांना आयएनएस, कुंजली, कोलाबा, मुंबई याठिकाणी बोलावलं जाईल. ही प्रक्रिया ३-६ सप्टेंबर २०१९ पर्यंत आयोजित केली जाईल.