जिवंत अर्भकास उघड्यावर फेकले, उपचारादरम्यान अर्भकाचा मृत्यू 

ADV
लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – उदगीर येथील शासकीय सामान्य रुग्णालय परिसरात एका मातेने जन्म दिलेले पुरुष जातीच्या जिवंत अर्भकास कचऱ्यामध्ये फेकून दिले. या अर्भकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून अर्भक फेकणाऱ्या या दाम्पत्याविरुध्द शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्भकाच्या डीएनएसाठी अर्भकास शवागृहात ठेवण्यात आले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’19bb496f-d357-11e8-bed4-dbebf14a5abf’]

येथील सामान्य रुग्णालय परिसरातील तालुका आरोग्य विभाग कार्यालयाच्या परिसरात एक जिवंत अर्भक उघड्यावर कचऱ्यामध्ये टाकलेले होते. येथील कर्मचारी सलीम शेख यांच्या निदर्शनास ही बाब आली असता शेख यांनी ही माहिती तात्काळ वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. डांगे यांना दिली. डॉ. डांगे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन जिवंत अर्भकास ताब्यात घेऊन त्याच्यावर उपचार सुरू केले. तसेच अर्भकाच्या मातेचा शोध घेण्याचाही रूग्णालय प्रशासनाने प्रयत्न केला. परंतु, रुग्णालयात नुकतीच बाळंतीण झालेली कोणतीही महिला आढळून आली नाही. तेव्हा या अर्भकास जन्म देणारी माता व तिचा पती रुग्णालयाच्या आवारातच असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डांगे यांना मिळाली.

ADV

[amazon_link asins=’8190568108′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1ede2388-d357-11e8-b964-e587f566985f’]

त्या दाम्पत्याकडे अर्भकाबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे देण्यास सुरूवात केली. तेव्हा त्या महिलेची नर्स मार्फत वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ती महिला आताच प्रसूत झाल्याचे नर्सने वैद्यकीय अधिकारी डॉ. डांगे यांना सांगितले. काही वेळानंतर त्या दाम्पत्याने अर्भक त्यांचेच असल्याचे कबूल केले. मात्र बाळ कुठे जन्माला आले, हे सांगण्यास टाळाटाळ केली. अर्भकास अधिक उपचारासाठी लातूर येथे पाठविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्या अर्भकाच्या डीएनए तपासणीकरिता मृत अर्भक शवागृहात ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.