Aaditya Thackeray On Eknath Shinde | कितीही रडारड करा, तुमच्यावरचा ‘गद्दार’ आणि ‘बापचोर’ टॅग पुसला जाणार नाही, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Aaditya Thackeray On Eknath Shinde | गद्दारांनी आतासुद्धा काहीतरी रडारड केली आहे. पण तुमच्यावर असलेला गद्दार आणि बापचोर हा टॅग कधीच पुसला जाणार नाही. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये पळवले जात आहेत. मुंबईच्या रक्तात क्रिकेट असताना वर्ल्डकप फायनल कुठे झाली तर गुजरातला झाली. जर तो सामना मुंबईत झाला असता तर वेगळा निकाल लागला असता, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथे पक्षाच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली, तसेच मी एक बाप आणि नवरा म्हणून अपयशी ठरलो, असे ते म्हणत मुख्यमंत्री भावूक झाले होते. या भाषणाला आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. मुंबईतील एका सभेत ते बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, गद्दार आणि खोटारड्यांवर महाराष्ट्र विश्वास ठेवू शकत नाही त्यामुळे ही रडारड चालली आहे. त्यामुळेच ही सगळी रडारड चालली आहे. खोटे बोलायचे हे त्यांचे धोरण आहे. त्यांच्याकडे कुणीही लक्ष देणार नाही. ज्यांनी त्यांना घडवले, त्यांना मंत्रिपद दिले, सगळे काही दिले. त्यांच्याच पाठीत जो माणूस खंजीर खुपसू शकतो, ते किती काळ्या मनाचे आहेत आणि त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे तुम्ही ठरवा.

आदित्य ठाकरे म्हणाले, या गद्दारांविरोधात किशोरी पेडणेकर, राजन साळवी, सूरज चव्हाण लढत आहेत. संजय राऊत तुरुंगात जाऊन आले, आता ते कोणालाच घाबरत नाहीत. दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्रीय संस्थांचा वापर केला जात आहे. उद्या तुमच्या घरीसुद्धा ईडी, सीबीआय घेऊन येतील, पण घाबरू नका. आपण एक होऊन मुंबईकर होऊन लढायचे आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut On Eknath Shinde | काय ही लाचारी… बाळासाहेब ठाकरे असते तर यांचा कडेलोट केला असता, संजय राऊतांचा शिंदे गटावर पलटवार

Pune Pimpri ACB Trap Case | देहुरोड विभागाचे ACP मुगूटलाल पाटील यांच्याकरिता 5 लाखाच्या लाचेची मागणी; 1 लाखाचा पहिला हप्ता घेताना ओंकार जाधव अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Police Inspector Transfers | चतुःश्रृंगी, लष्कर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : बेकायदेशीर गांजा बाळगणाऱ्या दोन महिलांना अटक, सव्वा लाखांचा गांजा जप्त