#Video Viral : …म्हणून ऐश्वर्याच्या हातातून हात सोडवत अभिषेककडे धावत गेली आराध्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ऐश्वर्या राय बच्चन आपली मुलगी आराध्यावर किती प्रेम करते हे आपल्याला तिच्या फोटोवरून कळतेच. आराध्या एअरपोर्टवर असो वा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी किंवा इनडोर लोकेशन असले तरी ती नेहमी आराध्याला आपल्या सोबत ठेवते. मजेशीर बाब अशी आहे की प्रत्येक मुलींसारखी आराध्याही डॅडीज डॉटर आहे. हे आम्ही म्हणत नाही तर अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्याच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवरून हे सिद्ध होत आहे.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, आराध्या आपली आई ऐश्वर्या सोबत एका बॉलिवूड Vs टेलिव्हीजन फुटबॉल मॅच पाहण्यासाठी गेली होती. इथे आराध्याचे पप्पा अभिषेकला पाहून आराध्याला स्वत:ला आवरणे मुश्किल झाले. तिने आईच्या हातातून हात सोडवत लगेचच अभिषेककडे धाव घेतली.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण हेच म्हणत आहे की, आराध्या आपल्या पप्पाची लाडकी आहे. व्हिडीओत दिसते की आराध्या अभिषेककडे पळत आल्यानंतर अभिषेकने लगेचच तिला उचलून कडेवर घेतले आहे.

अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी 20 एप्रिल रोजी आपल्या लग्नाचा 12 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी आराध्याही त्यांच्या सोबत दिसून आली. आपल्या लग्नाचा वाढदिवस आणखी स्पेशल करण्यासाठी दोघेही आराध्या सोबत मालदीवला गेले होते. तिथे त्यांनी व्हॅकेशनची सुट्टीही एन्जॉय केली.