Abdul Sattar | कृषिमंत्री अब्दुल सत्तारांवर गुन्हा दाखल; निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली?

सिल्लोड : पोलीसनामा ऑनलाइन – Abdul Sattar | शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असल्याचे दिसत आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात (Election Affidavit) खोटी माहिती दिल्याप्रकरणी अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. सिल्लोड न्यायालयाच्या (Sillod Court) तपासातून ही माहिती पुढे आली आहे.

 

अब्दुल सत्तार यांनी (Abdul Sattar) यांनी 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) निवडणूक आयोगाला (Election Commission) संपत्तीबाबत खोटी माहिती दिल्याचे पोलीस तपासात (Police investigation) समोर आले आहे. एकच जमीन जी 2014 रोजी खरेदी केली, त्याच्या दरामध्ये 2019 रोजी अधिकचा दर दाखवण्यात आला आहे. अशा एकूण 4 ते 5 मालमत्तांसंदर्भात देण्यात आलेल्या माहितीत तफावत असल्याचे न्यायालयाच्या तपासातून समोर आले आहे. त्यामुळे सिल्लोड न्यायालयाने या प्रकरणी खटला चालवण्याचे आदेश दिले आहे.

दरम्यान, या प्रकरणी सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली (Mahesh Shankarpalli) यांनी 2021 मध्ये याचिका दाखल केली होती. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी तपास केला. तेव्हा ही माहिती समोर आली आहे.
11 जुलै रोजी न्यायाधीश मीनाक्षी धनराज (Judge Meenakshi Dhanraj) यांनी सत्तारांविरुद्ध प्रथमदर्शनी
पुरावे असल्याचे मान्य करत फौजदारी खटला चालवण्याचे आदेश दिले आहे.
दरम्यान, हे आरोप सिद्ध झाल्यास अब्दुल सत्तार यांची आमदारकी जाईल. शिवाय सहा वर्षे निवडणूक लढण्यासही ते अपात्र ठरतील.

 

 

Web Title :  Abdul Sattar | case filed against agriculture minister abdul sattar false
information given in election affidavit police investigation reveals

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | पुण्यातील आजचा सोने आणि चांदीचा भाव किती? जाणून घ्या

Maharashtra Cabinet Expansion | मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनानंतर; खातेवाटप लवकरच होण्याची शक्यता

Maharashtra Rain Update | आज कोकणासह मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात ‘यलो अलर्ट’ जारी