Abdul Sattar | मदत करायची नसेल तर करू नका; पण शेतकर्‍यांची टिंगल तरी करू नका, एकनाथ खडसेंनी कृषी मंत्री अब्दुल सत्तारांना सुनावले

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन खरीप पिके शेतकर्‍यांच्या हातात आलेली नाहीत, अशा स्थितीत कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याकडून शेतकर्‍यांची टिंगल उडवली जात आहे. शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम कृषिमंत्री (Agriculture Minister) अब्दुल सत्तार (Abdul Sattar) करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे. ते जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

 

खडसे म्हणाले, एकतर शेतकर्‍यांना मदत करायची नसेल तर करू नका पण शेतकर्‍यांची टिंगल तरी करू नका, असे खडेबोल त्यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना सुनावले. दरम्यान, भोसरी भूखंड प्रकरणाचा (Bhosari MIDC Land Scam Case) तपास पुन्हा करण्यात येणार असल्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता खडसे म्हणाले, आतापर्यंत चार ते पाच प्रकरणात मला अडकवण्याचा प्रयत्न झाला, पण सुदैवाने न्यायालयाने माझ्या बाजूने निकाल दिल्यामुळे आज मी बाहेर आहे. पण भोसरी भूखंड प्रकरणी पुन्हा चौकशी म्हणजे कुठे ना कुठे नाथाभाऊंना अडकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कारण नाथाभाऊंना गुन्ह्यांमध्ये अडकवल्यानंतरच निवडणुका सोप्या जातात.

 

खडसे यांनी म्हटले की, अँटी करप्शनकडून पूर्णपणे चौकशी होऊन याचा क्लोजर रिपोर्ट दोन वर्षांपूर्वी न्यायालयात सादर करण्यात आला.
आता मात्र राज्य सरकारने आपल्याच तपासणी अधिकार्‍यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करत पुन्हा चौकशी अहवाल सादर केला
असून यामध्ये कुठलेही तथ्य नाही. मी यात निर्दोष आहे.

 

Web Title :- Abdul Sattar | eknath khadse spoke harshly to agriculture minister abdul sattar about the help of farmers

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

NCP MLA Rohit Pawar | ‘… म्हणून ते हवेत गेल्यासारखं वागतात’, रोहित पवारांचा राम शिंदेंना सणसणीत टोला

Gold-Silver Rate Today | दिवाळी सणात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करताय, जाणून घ्या आजचा भाव

Pune Crime | येरवड्यात पूर्व वैमनस्यातून दरबार बेकरीजवळ राहणाऱ्या तरुणाचा खून