NCP MLA Rohit Pawar | ‘… म्हणून ते हवेत गेल्यासारखं वागतात’, रोहित पवारांचा राम शिंदेंना सणसणीत टोला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) आणि भाजप आमदार राम शिंदे (BJP MLA Ram Shinde) यांच्यामध्ये साखर कारखान्यावरुन चांगलाच वाद पेटला आहे. रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी राम शिंदे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. भाजपचे राम शिंदे आपली सत्ता आली आहे आणि त्यातून आपल्या विरोधकावर कारवाई करायची हा त्यांचा हेतू आहे. सरकार आल्यामुळे सध्या ते हवेत गेल्यासारखं वागत आहेत, असा सणसणीत टोला त्यांनी राम शिंदेंना लगावला.

 

कारखाने पंधरा दिवस उशिरा सुरु होणार आहेत. त्यामुळे हंगामही लांबणार आहे. गेल्यावर्षी अनेक शेतकऱ्यांचा ऊस उभा होता. उन्हाळ्यात ऊस तोडावा लागला. शेतकऱ्यांचेही नुकसान झाले. माझ्या विरोधकांना केवळ विरोध करणं माहित आहे. विकासाबद्दल त्यांना काहीही घेणंदेणं नाही. माझ्यावर कारवाईबाबत त्यांनी राजकीय दृष्टिकोनातून भलंमोठं पत्र लिहिलं. त्याचवेळी त्यांनी अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांबाबतही सरकारला पत्र लिहले असते तर मान्य केलं असतं, अशी टीका रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी राम शिंदे यांच्यावर केली.

 

काय म्हणाले होते राम शिंदे?

सामाजिक, सार्वजनिक आणि राजकीय जीवनात आरोप पत्र होत असतात.
लोकप्रतिनिधीने चिडायचे नसते मी देखील जलसंधारण मंत्री होतो त्याची देखील ओपन चौकशी झाली.
एसीबीची चौकशी (ACB Inquiry) झाली.
तरी मी कधीही म्हटलं नाही चौकशी करु नका.
मात्र आपलाच कारखाना फक्त शेतकरी हिताचा आहे असे नाही,
आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह सर्व कारखाने शेतकरी विरोधी आहे असे नाही, त्यांनी अर्धी चूक मान्य केली,
असे म्हणत राम शिंदे यांनी रोहित पवारांना टोला लगावला होता.

 

 

Web Title :- NCP MLA Rohit Pawar | letter should be written about the farmers rohit pawars reply to ram shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा