Abhishek Bachchan News | आईच्या एका अटीमुळं अपूर्ण राहिलं अभिषेक बच्चनचं पहिलं प्रेम, जाणून घ्या काय होती ‘ती’ अट

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आपल्या जीवनात पहिलं प्रेम अगदीच महत्वपूर्ण असते. पहिल्या प्रेमाचा अनुभव काही खास असतो. मात्र फार कमी आणि नशीबवान लोकांना पहिलं प्रेम मिळतं. प्रेमात अनेक कठीन गोष्टींचा सामना करावा लागतो. अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan News) आणि करिश्मा कपूर यांच एकमेकांवर प्रेम जडलं होत. एके काळी अभिषेक (Abhishek Bachchan News) आणि करिश्माच्या नात्याबद्दल तुफान चर्चा रंगल्या होत्या.

महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या 60 व्या वाढदिवसा दिवशी अभिनेत्री करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांचा साखरपूडा (Karishma Kapoor – Abhishek Bachchan Engagement) करण्यात आला होता. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्या लग्नाची ओढ लागली होती. परंतु त्यांच लग्न अचानकपणे रद्द करण्यात आलं. बच्चन (Bachchan Family) आणि कपूर (Kapoor Family) कुटूंबातील मतभेदामुळं हे लग्न कॅन्सल करण्यात आलं (Abhishek Bachchan News).

त्या दोघांचा साखरपुडा झाल्यानंतर करिश्माची (Karishma Kapoor) आई बबीता यांनी बच्चन कुटूंबाचा संपत्तीचा काही भाग अभिषेकच्या नावावर करावा, ज्यामुळं करिश्माला भविष्यात कोणत्याही परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही, अशी अट घातली. ही अट बच्चन कुटूंबीयांना अमान्य होती.

मात्र जया बच्चनने (Jaya Bachchan) लग्न झाल्यानंतर करिश्मा चित्रपटांमध्ये काम करणार नाही, अशी अट घातली. परंतु ही अट खुद्द करिश्माला मान्य नसल्याने, तिनं अभिषेकला (Abhishek Bachchan) नकार दिला. दोन्ही कुटूंबामध्ये असलेल्या मतभेदामुळं त्या दोघांचे लग्न होऊ शकलं नाही.

Web Title :- Abhishek Bachchan News | karisma kapoor and abhishek bachchan engagement broke due to jaya and babita condition

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा