लग्नाचे आमिष दाखवून महिला पोलीस कर्मचाऱ्यावर अत्याचार

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – हिंगोली पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करून गर्भपात केल्याप्रकरणी औंढा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यावर वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुनीर इब्राहिम मुन्नीवाले असे गुन्हा दखल करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात कर्यरत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला औंढा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी मुनीर मुन्नीवाले याने लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर महिला ज्या ठिकाणी कर्तव्यावर गेली तिथे जाऊन तिच्यावर अत्याचार केले. महिला गोरोदर राहिल्यानंतर त्याने तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात करून अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरानंतर पीडित महिलेने सोमवारी रात्री उशिरा वसमत शहर पोलीस ठाण्यात मुनीर मुन्नीवाले याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख करीत आहेत.

You might also like