PM मोदींच्या मतदारसंघात ABVP चा सुपडा साफ; काँग्रेसच्या NSUI दणदणीत विजय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्याच्या दुस-या दिवशीच भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठा धक्का बसला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदार संघातील महात्मा गांधी काशी विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटना निवडणुकीत अभाविपचा ( ABVP) दारुण पराभव झाला आहे. निवडणुकीत काँग्रेसच्या NSUI ने मोठा विजय मिळविला आहे. एकूण 8 जागापैकी 6 जागा जिंकत NSUI ने अभाविपला जोरदार धक्का दिला आहे.

विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटना निवडणुकीत कॉंग्रेसचे NSUI आणि सपाच्या विद्यार्थी संघटनांनी बनविलेल्या पॅनलला घवघवीत यश मिळाले आहे. एनएसयुआयने या निवडणुकीत उपाध्यक्ष, महामंत्री सह सहा प्रतिनिधी पदांवर विजय मिळविला आहे. महात्मा गांधी काशी विद्यापीठामध्ये NSUI चे संदीप पाल हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. तर प्रफुल्ल पांडेय महामंत्री बनले आहेत. तर सपाचे विमलेश यादव अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. दुसरीकडे लायब्ररी मंत्री म्हणून आशिष गोस्वामी हा अपक्ष म्हणून निवडून आले आहेत.