अहमदनगर : 10 हजाराची लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जमीन मोजणी लवकर करण्यासाठी दहा हजार रुपये स्वीकारताना श्रीरामपूर भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिकास नगरचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. आज दुपारी ही कारवाई करण्यात आली.

बाबुराव यादवराव राशीनकर (वय 55 वर्षे, छाननी लिपिक, उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय श्रीरामपूर, रा.वार्ड नंबर 7, कौशिक अपार्टमेंट, फ्लॅट नंबर 2 श्रीरामपूर, वर्ग 3) हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या लिपिकाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांचे भोकर येथील जमिनीची मोजणी लवकर करून देण्यासाठी राशीनकर याने पंचासमक्ष 22 हजार 500 रुपयांची लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 10 हजार रुपयांची लाचेची मागणी करून सदर लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Loading...
You might also like