पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयातील लिपीक १५०० ची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवाजीनगर न्यायालयातील लिपीकास दीड हजार रूपयाची लाच स्विकारताना पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरूवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास रंगेहाथ पकडले आहे. न्यायालयातील लिपीकास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने प्रंचड खळबळ उडाली आहे.

प्रसन्‍नकुमार भागवत असे लाच घेणार्‍या शिवाजीनगर न्यायालयातील लिपीकाचे नाव आहे. तक्रारदाराला न्यायालयातून काही सर्टिफाइड कॉपी हव्या होत्या. त्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. ती कागदपत्रे देण्यासाठी लिपीक भागवत यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. प्राप्‍त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये लिपीक भागवत हे लाच मागत असल्याचे निष्पन्‍न झाले. अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने गुरूवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सापळा रचला. त्यावेळी लिपीक भागवत यांनी सरकारी पंचासमक्ष तक्रारदाराकडून दीड हजार रूपयाची लाच स्विकारली.

अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने भागवत यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे काम चालु आहे. पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी श्रीहरी पाटील आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत नागरिकांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे अथवा टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा असे आवाहन अ‍ॅन्टी करप्शन विभागाचे पोलिस अधिक्षक संदीप दिवाण यांनी केले आहे.

आरोग्यविषयक बातम्या

अशा प्रकारेदेखील खावू शकता भाज्या, होतील अनेक फायदे

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा

लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा