७/१२ उताऱ्याच्या नोंदीसाठी ३ हजाराची लाच घेणारा एसीबीच्या जाळ्यात

पुणे | पोलीसनामा आॅनलाइन

खरेदी केलेल्या जमिनीची ७/१२ उताऱ्यावर व फेरफारमध्ये नोंद करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच घेणाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. विजय भिमराव भोळे (वय 34, रा. वकीलवस्ती सुरवाड, ता. इंदापूर) असे अटक केलेल्या खासगी इसमाचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’849b4a63-c97b-11e8-8f10-4bf4c74de7cc’]

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विजय भोळे हे कात्रज तलाठी कार्यालयात काम करणारे खासगी व्यक्ती आहेत. जमिनीच्या नोंदी ७/१२ उताऱ्यावर तसेच फेरफारमध्ये तलाठी यांच्याकडून प्रमाणीत नक्कल देतो म्हणून त्यांनी तक्रारदाराकडे ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यावरुन आज दि. ६ शनिवार रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून अलंकार थिएटरजवळ 3 हजार रुपयांची लाच घेताना विजय भोळे यांना रंगेहात पकडले.

[amazon_link asins=’B07DJHV6S7′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8d7d4f0b-c97b-11e8-a94c-656d87669e5b’]

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी प्रतिभा शेडगे, पोलीस निरीक्षक सुरेखा घार्गे यांनी केली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक राजु चव्हाण करीत आहेत.

पिंपरी-चिंचवड : गुन्हे शाखेत ३८ पोलीस कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या

शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी केले आहे.

१) हेल्पलाईन टोल फ्रि क्रमांक १०६४
२) अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे- ०२० -२६१२२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३