लातूर जिल्ह्यातील अहमदपूर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचार्‍याला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयात जामीनासाठी मदत करण्यासाठी 5 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती एक हजार रूपयाची लाच स्विकारणार्‍या अहमदपूर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचार्‍याला नांदेड येथील अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्यामुळे लातूर पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

उल्हास सखाराम चव्हाण असे लाच घेणार्‍या पोलिस कर्मचार्‍याचे नाव आहे. तक्रारदाराविरूध्द अहमदनगर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. त्या गुन्हयात जामीन मिळवण्यासाठी मदत करण्याच्या कारणावरून पोलिस कर्मचारी उल्हास चव्हाण यांनी तक्रारदाराकडे 5 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती एक हजार रूपयाची लाच देण्याचे ठरले. दरम्यान, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार केली. प्राप्‍त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. सापळा रचला असता सरकारी पंचासमक्ष पोलिस कर्मचारी उल्हास चव्हाण यांनी एक हजार रूपयाची लाच स्विकारली. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार करावी अन्याथा टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा असे आवाहन अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडून करण्यात आले आहे.

ही सापळा कारवाई पोलिस निरीक्षक भुजंग गोडबोले, पोलिस कर्मचारी गणेश तालकोकूलवार, एकनाथ गंगातीर्थ, यादव दर्शन आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केली आहे. पोलिस कर्मचार्‍याला एक हजाराची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडल्याने अहमदपूरमध्ये खळबळ उडाली होती.

आरोग्यविषयक वृत्त

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

असे होते ‘एचआयव्ही’ या गंभीर आजाराचे संक्रमण, ही आहेत ‘लक्षणे’