१० हजारांची लाच स्वीकारताना पोलिस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – गुन्ह्यात मदत करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक एसीबीच्या जाळ्यात अडकला. आज सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

रामनाथ महादेव सानप (पोलीस नाईक,ब. न. 355, नेमणूक संगमनेर पोलीस स्टेशन) पकडलेल्या लाचखोर पोलिस कर्मचाऱ्याच्या नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, तक्रारदाराच्या बहिणीचा नातू फरदिन शेख याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलिस स्टेशन येथे दाखल भादंवि 326 गुन्हा दाखल आहे. गुन्ह्यात दोषारोप सादर करण्यास केलेल्या मदतीचे मोबदल्यात व त्याचेवर चॅप्टर केस मध्ये मदत करण्यासाठी 11 जुलै रोजी 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर आज दहा हजार रुपये स्वीकारताना नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

पोलीस निरीक्षक शाम पवरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक दिपक करांडे यांच्यासह नगर येथील कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. या कारवाईमुळे संगमनेरात खळबळ उडाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या