४२०० ची लाच घेणारा पोलीस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पकडलेले वाहन सोडविण्यासाठी जीपचालकाकडून ५००० च्या लाचेची मागणी करून ४२०० ची लाच स्वीकारणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (शनिवार) रात्री रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.

अब्दुल सत्तार महीबूब पटेल (वय ४३ वर्षे, पोलीस नाईक, ब. नं. ७७०, नेम शहर वाहतूक शाखा (उत्तर), सोलापूर शहर. रा. घर नं ३०/१, केशव नगर, पोलीस आयुक्तालयाजवळ, सोलापूर ) असे लाच घेणाऱ्याचे नाव आहे. यातील तक्रारदार यांचे अडवून ठेवलेले छोटा हत्ती वाहन सोडण्यासाठी ५००० रुपयाच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडी अंती ४२०० रूपये लाचेची मागणी करून ती लाच रक्कम स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले. ही सापळा कारवाई अजितकुमार जाधव ( पोलीस उप अधीक्षक), जगदीश भोपळे (पोलीस निरीक्षक), निलकंठ जाधवर (सहा. पोलीस उपनिरीक्षक), कर्मचारी चंद्रकांत पवार, संतोष वाघमारे, सिद्धाराम देशमुख, प्रफुल्ल जानराव आणि चालक शाम सुरवसे यांच्या पथकाने केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त