पुण्यात थरार ! 10 लाखाच्या लाच प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी पोलिस आयुक्‍तालयातील गुन्हे शाखेतील युनिट-2 चे पोलिस निरीक्षक आणि म्हाळूंगे पोलिस चौकीचे प्रभारी अधिकार्‍यावर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने धडक कारवाई केली आहे.

भानुदास जाधव असे पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. यापुर्वी देखील भानुदास जाधव यांच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. मुंबईला असताना ते प्रकरण घडले होते. त्यामध्ये त्यांना शिक्षा देखील झाली होती. दरम्यान, पोलिस निरीक्षक भानुदास जाधव यांनी काही लाखांमध्ये लाच घेतल्याची माहिती समोर आली आहे. पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे यांनी दिली आहे. निरीक्षक भानुदास जाधव यांनी याप्रकरणी सर्वप्रथम 10 लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी तडजोड करून 7 लाख रूपये मागितले. त्यापैकी 4 ते 5 लाख घेण्यासाठी निरीक्षक जाधव यांनी आज तक्रारदारास बोलावले होते.

निरीक्षक भानुदास जाधव यांनी आज संध्याकाळी नेमकी किती लाखाची लाच घेतली हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे. पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक श्रीहरी पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

Visit : Policenama.com