ज्यूनि. इंजिनीयरच्या घरावर ‘अ‍ॅन्टी करप्शन’चा छापा ! नोटांचे बंडलं पाहून अधिकार्‍यांची ‘भंबेरी’ उडाली, 9 तास चाललं मोजण्याचं काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – झारखंडमधील सेरीकेला-खरसावां जिल्ह्यात ग्रामीण विकास विभागात कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंत्याच्या घरावर एसीबीने धाड टाकून 2.44 कोटी रुपये जप्त केले. एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अरविंद कुमार सिंह यांनी याविषयी सांगितले की, कनिष्ठ अभियंता सुरेश प्रसाद वर्मा याला एका ठेकेदाराकडून 10 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या घरावर देखील छापा मारण्यात आला.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठेकेदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला लाच घेताना रंगेहाथ अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता आणि त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर 100 ग्रॅम सोने, 2.44 कोटी रुपये रोख रक्कम आणि जमिनींचे कागदपत्र जप्त करण्यात आले. या कामगिरीचे नेतृत्व हे अरविंद कुमार सिंह यांनी केले. आढळून आलेली रोख रक्कम मोजण्यास अधिकाऱ्यांना एकूण 9 तास लागले. जप्त केलेल्या या नोटांमध्ये 2 हजार आणि 500 रुपयांच्या नोटांचा सर्वाधिक समावेश आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like