ACB Trap Case News | वेअर हाऊसच्या परवान्याचे नुतनीकरण करण्यासाठी लाच घेताना सहकार अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap Case News | एका वेअर हाऊसच्या नुतनीकरणासाठी 10 हजार रुपये लाच स्वीकारताना नायगाव येथील सहायक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. बाबुराव चतरू पवार (वय 54 रा. पितृछाया निवास, जनार्दननगर, हनुमान गढ, नांदेड) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या क्लास वन अधिकाऱ्याचे नाव आहे. एसीबीच्या पथकाने ही कारवाई शुक्रवारी (दि. 24) सायंकाळी केली. (ACB Trap Case News)

याबाबत 37 वर्षीय व्यक्तीने नांदेड एसीबी कार्यालयात 18 नोव्हेंबर रोजी तक्रार केली आहे. तक्रारदार हे रिध्दी ऍग्रो वेअर हाऊस येथे मागील 3 वर्षापासून वॉचमन म्हणून काम करत आहेत. त्यांच्या मालकाने त्यांना वेअर हाऊसचा परवाना नूतनीकरण करण्याबाबत सांगितले होते. तक्रारदार यांनी सहाय्यक निबंधक सोसायटी कार्यालय, नायगाव येथे जावून रितसर शासकीय फि भरून बँकेचे चालान भरून त्याची प्रत सहाय्यक निबंधक सोसायटी कार्यालय, नायगाव येथील सहकार अधिकारी बाबुराव पवार यांना आणून दिली. तेव्हा आरोपी बाबुराव पवार यांनी मालकाकडून 10 हजार रुपये घेवून या नंतरच काम होईल असे म्हणून दहा हजार रूपयांची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे 18 नोव्हेंबर रोजी तक्रार दिली. (ACB Trap Case News)

त्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने तक्रारदार यांना लाच मागणी पडताळणीसाठी पाठविले. त्यावेळी आरोपी पवार यांनी तुमच्या मालकाला घेवून या असे सांगितले. शुक्रवारी (दि.24) तक्रारदार यांनी त्यांचे मालकाला आरोपी पवार यांची भेट घेण्यासाठी पाठवले. आरोपी पवार यांनी पंचासमक्ष वेअर हाऊसचे परवान्याचे नुतणीकरणासाठी दहा हजार रूपयाची मागणी केली. पथकाने सापळा रचला. पंचासमक्ष 10 हजार रुपये लाच स्विकारतांना बाबुराव पवार याला रंगेहाथ पकडण्यात आले. बाबुराव पवार यांना ताब्यात घेण्यात आले असुन नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नांदेड एसीबीच्या पोलीस निरीक्षक प्रिती जाधव करीत आहेत.

ही कारवाई एसीबी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक प्रशांत पवार, पोलीस निरीक्षक स्वप्नाली धुतराज,
सहायक पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर, पोलीस अंमलदार शेख रसुल, राजेश राठोड, प्रकाश मामुलवार यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | चोरी करण्यास नकार दिल्याने महिलेचे दात पाडले, एकाला अटक; पिंपरी मधील घटना

SBI बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, अल्पवयीन मुलासह दोघे ताब्यात; पिंपरी येथील घटना

आळंदी येथील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, एकाला अटक; दोन महिलांची सुटका

Chandrashekhar Bawankule-Pankaja Munde | पंकजा मुंडेंवर अन्याय होत असल्याच्या काँग्रेस-शिंदे गटाच्या आरोपावर बावनकुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘त्यांच्या रक्तात’

विमानाचे तिकीट देण्याच्या बहाण्याने फसवणूक, रावेत येथील प्रकार