Pune Crime News | विमानाचे तिकीट देण्याच्या बहाण्याने फसवणूक, रावेत येथील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | सिंगापूर विमानाचे तिकीट बुक (Pune To Singapore Flight Ticket) करुन देण्याच्या बहाण्याने एका युवकाची 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार ऑनलाईन पद्धतीने 17 मे 2022 रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास युवकाच्या घरी घडला आहे. याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात (Ravet Police Station) टुर्स एजन्सी व ट्रॅव्हल एजंट यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत सुशांत सुर्य़कांत जाधव (वय-33 रा. शिंदे वस्ती, रावेत) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन नवी दिल्ली येथील साई टुर्स हॉलीडेज कंपनीचे संचालक व ट्रॅव्हल एजंट शैलेश बिडवे (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर आयपीसी 406, 420, 34 नुसार गुन्हा (Cheating Fraud Case) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना सिंगापुरला जायचे होते. त्यासाठी त्यांनी विमान तिकीट बुकींसाठी नवी दिल्ली येथील साई टुर्स हॉलीडेज कंपनीशी संपर्क साधला. या कंपनीमध्ये ट्रॅव्हल एजंट म्हणून काम करणाऱ्या शैलेश बिडवे याने फिर्यादी यांच्याशी संपर्क साधून विश्वास संपादन केला.

सिंगापुर विमानाचे तिकीट बुकींग करण्यासाठी एस.टी.एच. जर्नी सोल्युशन प्रा. लि.
या नावाच्या बँक खात्यात 50 हजार रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी कंपनीच्या बँक खात्यात ऑनलाईन पैसे पाठवले. त्यानंतर विमानाचे तिकीट न देता आरोपींनी फसवणूक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पन्हाळे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Govt News | खुशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय 60 वर्ष करण्याचा CM शिंदेंचा विचार

गोडावूनचा ताबा सोडण्यासाठी 17 लाखांची मागणी, पुण्यातील कामगार संघटनेच्या अध्यक्षावर खंडणीचा गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, सहकारनगर व कोरेगाव पार्क परिसरातील घटना

Pune Crime News | लोणी काळभोर, कोंढवा आणि सिंहगड रोड परिसरात घरफोडीच्या घटनामध्ये 9 लाखांचा ऐवज लंपास

ACB Trap News | लाच स्वीकारताना महिला सरपंचासह पती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

रस्त्यात मिठी मारुन तरुणाला लुटले, नागरिकांनी आरोपीला पकडले

‘मला सलमान भाई म्हणतात’ पिंपरीत ‘कोयता भाई’ची दहशत

भररस्त्यात महिलेचा दुप्पटा ओढून विनयभंग, दोघांना अटक; लोणी काळभोर परिसरातील घटना

जुन्या भांडणातून भोसरीत तरुणावर सत्तुरने वार, दोघांना अटक

नेट बँकिंगचा पासवर्ड घेऊन महिलेची 15 लाखांची फसवणूक, पुण्यातील शनिवार पेठेतील प्रकार