Chandrashekhar Bawankule-Pankaja Munde | पंकजा मुंडेंवर अन्याय होत असल्याच्या काँग्रेस-शिंदे गटाच्या आरोपावर बावनकुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘त्यांच्या रक्तात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrashekhar Bawankule-Pankaja Munde | भाजपा नेत्या पंकजा मुंडे पक्षावर नाराज असल्याची चर्चा नेहमीच सुरू असते. त्यांनी सुद्धा अनेकदा विविध पद्धतीने त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. आता पुन्हा एकदा त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर म्हणाले होते की, माझ्या पक्षाचे १४५ आमदार निवडून आले तर आम्ही पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करू. यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनीही पंकजा यांच्यावर अन्याय होत असल्याचे म्हटले. यावर भाजपा प्रदेशाध्यक्षांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Chandrashekhar Bawankule-Pankaja Munde)

पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या चर्चांवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, माझे दर आठ-दहा दिवसांनी पंकजा मुंडे यांच्याशी बोलणे होते, भेटणे होते. अलिकडेच मी त्यांना भेटून आलो. त्या नाराज नाहीत. पंकजा मुंडे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांच्या नेतृत्वाला बदनाम करण्याचे काम केले जात आहे. वेगवेगळ्या माध्यमातून असे प्रकार होत असतात. (Chandrashekhar Bawankule-Pankaja Munde)

बावनकुळे म्हणाले, काहींना वाटते की, पंकजा मुंडे पक्षावर नाराज राहिल्या तर त्याचा त्यांना काहीतरी फायदा होईल. परंतु, पंकजा मुंडे यांच्या रक्तात भाजपा आहे. त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांच्या कर्तृत्वाने महाराष्ट्रात भाजपा उभी राहिली आहे. पंकजा मुंडे पक्षावर नाराज राहू शकत नाहीत.

काय म्हणाले संजय गायकवाड, यशोमती ठाकूर…


शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले की, पंकजा मुंडेंवर अन्याय झाला आहे, हो, हे खरे आहे की, पंकजा मुंडेंवर अन्याय झाला आहे. त्यांच्या वडिलांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी आणि समाजासाठी खूप काही केले आहे. परंतु, असे कुठेतरी वाटत आहे की मागच्या काही निवडणुकांमध्ये त्यांच्यावर अन्याय झाला आहे. तर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी म्हटले की, पंकजा मुंडे यांना न्याय मिळायला हवा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Govt News | खुशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय 60 वर्ष करण्याचा CM शिंदेंचा विचार

गोडावूनचा ताबा सोडण्यासाठी 17 लाखांची मागणी, पुण्यातील कामगार संघटनेच्या अध्यक्षावर खंडणीचा गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, सहकारनगर व कोरेगाव पार्क परिसरातील घटना

Pune Crime News | लोणी काळभोर, कोंढवा आणि सिंहगड रोड परिसरात घरफोडीच्या घटनामध्ये 9 लाखांचा ऐवज लंपास

ACB Trap News | लाच स्वीकारताना महिला सरपंचासह पती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

रस्त्यात मिठी मारुन तरुणाला लुटले, नागरिकांनी आरोपीला पकडले

‘मला सलमान भाई म्हणतात’ पिंपरीत ‘कोयता भाई’ची दहशत

भररस्त्यात महिलेचा दुप्पटा ओढून विनयभंग, दोघांना अटक; लोणी काळभोर परिसरातील घटना

जुन्या भांडणातून भोसरीत तरुणावर सत्तुरने वार, दोघांना अटक

नेट बँकिंगचा पासवर्ड घेऊन महिलेची 15 लाखांची फसवणूक, पुण्यातील शनिवार पेठेतील प्रकार