Pune Pimpri Chinchwad Crime News | चोरी करण्यास नकार दिल्याने महिलेचे दात पाडले, एकाला अटक; पिंपरी मधील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | चोरी करण्यास नकार दिल्याने तसेच खर्चासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने एका महिलेला बेदम मारहाण करुन चार दात पाडून गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि.24) रात्री साडेसातच्या सुमारास पिंपरी येथील संजय गंधीनगर येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत एका महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. तर सुभाष उर्फ चेंड्या मनोज टाक (वय-45 रा. सुभाष नगर, रिव्हर रोड, पिंपरी) याच्यावर आयपीसी 325, 323, 504 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्य़ादी यांना त्याच्यासोबत चोरी करण्यासाठी चलण्यास सांगितले. मात्र, फिर्यादी यांनी याला नकार दिला. त्यानंतर आरोपीने खर्चासाठी पैशांची मागणी केली. महिलेने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे चिडलेल्या आरोपीने महिलेला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच तोंडावर फाईट मारुन चार दात पाडले. तसेच उजवा हात पिरगळुन कोपऱ्यामध्ये फ्रॅक्चर करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक कदम करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule-Pankaja Munde | पंकजा मुंडेंवर अन्याय होत असल्याच्या काँग्रेस-शिंदे गटाच्या आरोपावर बावनकुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘त्यांच्या रक्तात’

Maharashtra Govt News | खुशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय 60 वर्ष करण्याचा CM शिंदेंचा विचार

गोडावूनचा ताबा सोडण्यासाठी 17 लाखांची मागणी, पुण्यातील कामगार संघटनेच्या अध्यक्षावर खंडणीचा गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, सहकारनगर व कोरेगाव पार्क परिसरातील घटना

Pune Crime News | लोणी काळभोर, कोंढवा आणि सिंहगड रोड परिसरात घरफोडीच्या घटनामध्ये 9 लाखांचा ऐवज लंपास

ACB Trap News | लाच स्वीकारताना महिला सरपंचासह पती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

रस्त्यात मिठी मारुन तरुणाला लुटले, नागरिकांनी आरोपीला पकडले

‘मला सलमान भाई म्हणतात’ पिंपरीत ‘कोयता भाई’ची दहशत

भररस्त्यात महिलेचा दुप्पटा ओढून विनयभंग, दोघांना अटक; लोणी काळभोर परिसरातील घटना