Pune Pimpri Chinchwad Crime News | आळंदी येथील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, एकाला अटक; दोन महिलांची सुटका

आळंदी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पैश्यांचे आमिष दाखवून घरामध्येच महिलांकडून वेश्याव्यवसाय (Prostitute Racket) करुन घेणाऱ्या आरोपीला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाच्या (Pimpri AHTU Cell) पथकाने अटक केली आहे. तर दोन महिलांची सुटका केली आहे. पोलिसांनी ही कारवाई गुरुवारी (दि.23) रात्री सव्वा दहाच्या सुमारास आळंदी देवाची (Alandi Devachi) येथील चाकण रोडवरील (Chakan Road) केळगाव येथे केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याप्रकरणी बसवराज सुबन्ना बिरादार (वय 36, रा.केळगाव, आळंदी मूळ रा. राजापुर रोड, गुलबर्गा, कर्नाटक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून आरोपीवर आयपीसी 370 सह अनैतिक व्यापार अधिनियम 1956 कलम 4,5 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महिला पोलीस हवालदार वैष्णवी विजय गावडे (वय-36) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बसवराज बिरादार हा त्याच्या राहत्या घरामध्ये महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीची खात्री करुन पोलिसांच्या पथकाने गुरुवारी रात्री आरोपीच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करुन बसवराज याला अटक केली आहे. तसेच 7 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule-Pankaja Munde | पंकजा मुंडेंवर अन्याय होत असल्याच्या काँग्रेस-शिंदे गटाच्या आरोपावर बावनकुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘त्यांच्या रक्तात’

Maharashtra Govt News | खुशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय 60 वर्ष करण्याचा CM शिंदेंचा विचार

गोडावूनचा ताबा सोडण्यासाठी 17 लाखांची मागणी, पुण्यातील कामगार संघटनेच्या अध्यक्षावर खंडणीचा गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, सहकारनगर व कोरेगाव पार्क परिसरातील घटना

Pune Crime News | लोणी काळभोर, कोंढवा आणि सिंहगड रोड परिसरात घरफोडीच्या घटनामध्ये 9 लाखांचा ऐवज लंपास

ACB Trap News | लाच स्वीकारताना महिला सरपंचासह पती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

रस्त्यात मिठी मारुन तरुणाला लुटले, नागरिकांनी आरोपीला पकडले

‘मला सलमान भाई म्हणतात’ पिंपरीत ‘कोयता भाई’ची दहशत

भररस्त्यात महिलेचा दुप्पटा ओढून विनयभंग, दोघांना अटक; लोणी काळभोर परिसरातील घटना

जुन्या भांडणातून भोसरीत तरुणावर सत्तुरने वार, दोघांना अटक

नेट बँकिंगचा पासवर्ड घेऊन महिलेची 15 लाखांची फसवणूक, पुण्यातील शनिवार पेठेतील प्रकार