ACB Trap News | 20 हजार रूपयाच्या लाच प्रकरणी कराड प्रांत कार्यालयातील दोघे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

कराड : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | मूल्यांकनाची प्रक्रिया पुर्ण करण्याकरिता प्रत्येकी 10 हजार असे एकुण 20 हजार रूपायाची लाच घेतल्याप्रकरणी (Karad ACB Trap) कराड प्रांत कार्यालयातील (Karad Prant Office) दोघांना अ‍ॅन्टी करप्शनच्या विभागाच्या पथकाने (Anti Corruption Bureau Maharashtra) रंगेहाथ पकडले आहे (Karad Crime News). त्यांच्याविरूध्द गुन्हा First Information Report (FIR) दाखल करण्यात आला असून त्यांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. (ACB Trap News)

रामचंद्र श्रीरंग पाटील Ramchandra Shrirang Patil (नोकरी- लिपीक, भूसंपादन शाखा, प्रांत ऑफीस कराड – कंत्राटी) आणि दिनकर रामचंद्र ठोंबरे Dinkar Ramchandra Thombre (नोकरी – लिपीक, भूसंपादन शाखा, प्रांत ऑफीस कराड – कंत्राटी) अशी लाच घेणार्‍यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे शेतकरी संघटनेचे (Shetkari Sanghatna) अध्यक्ष असून त्यांनी कराड तालुक्यातील येरवळे गावच्या शेतकर्‍यांकडून भूसंपादनाच्या प्रक्रियेत विविध शासकीय कार्यालयात पाठपुरावाठ करण्यासाठी प्रतिज्ञापत्र घेतलेले आहे. (ACB Trap News)

तक्रारदार हे उपविभागीय अधिकारी कराड (Karad Sub Divisional Office) यांच्या कार्यालयात मूल्यांकन प्रक्रियेबाबत पाठपुरावा करण्याकरिता गेले होते. त्यावेळी रामचंद्र श्रीरंग पाटील आणि दिनकर रामचंद्र ठोंबरे यांनी मूल्यांकनाची प्रक्रिया पुर्ण करण्याकरिता लाचेची मागणी करून 20 हजार रूपये घेतले. सरकारी पंचासमक्ष त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. (Karad Bribe Case)

 

पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे (Pune ACB SP Amol Tambe),
अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav), पोलिस उप अधीक्षक उज्वल वैद्य (DySP Ujjwal Vaidya),
पोलिस निरीक्षक विक्रम पवार (PI Vikram Pawar), सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शंकर सावंत (ASI Shankar Sawant), पोलिस नाईक निलेश राजपूरे आणि पोलिस अंमलदार विक्रमसिंह कणसे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title :  ACB Trap News | 20 thousand rupees bribe case, two from Karad prant office in anti-corruption net

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा