ACB Trap News | 15 हजार रुपयांची लाच घेताना पोलीस अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

पोलीसनामा ऑनलाइन – गुन्ह्यात पकडलेली दुचाकी परत देण्यासाठी 15 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) जळगाव जिल्हयातील (Jalgaon ACB Trap) चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील (Chopda Rural Police Station) सहायक फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) सापळा रचून रंगेहाथ पकडले. शिवाजी ढगु बाविस्कर Shivaji Dhagu Baviskar (वय-52) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. एसीबीच्या पथकाने (ACB Trap News) ही कारवाई शुक्रवारी (दि.25) चोपडा शहरात केली.

याबाबत धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील जोयदा येथील 32 वर्षाच्या व्यक्तीने जळगाव एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार केली आहे. पोलीसांनी तक्रारदार यांचे चुलत भाऊ व त्याच्या मित्राची बुधवारी (दि.23) रात्री नऊच्या सुमारास लासूर गावाजवळ मोटार सायकल अडवली. तुमच्या जवळ गांजा (Marijuana) आहे अशी खबर मिळाली आहे, तुम्ही स्टेशनला चला असे सांगितले. जर गांजाची केस व मोटार सायकल सोडवायची असेल तर 75 हजार रुपये आम्हाला द्यावे लागतील असे सांगुन तडजोडी अंती तक्रारदार यांच्या नातेवाईकांकडुन पहाटे चार वाजता 30 हजार रुपये घेतले.

शिवाजी बाविस्कर यांनी मोटार सायकल ठेवून घेतली. जर तुम्हाला मोटार सायकल सोडवायची असेल तर तुम्हाला आणखी 20 हजार रुपये दयावे लागतीत असे सांगितले. त्यानंतर गुरुवारी तक्रारदार यांच्याकडे बाविस्कर यांनी गांजाची केस न करण्यासाठी व मोटार सायकल सोडण्यासाठी 20 हजार रुपयेची मागणी केली. तडजोडअंती 15 हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी याबाबत जळगाव एसीबीकडे (Jalgaon ACB Trap News) तक्रार केली. पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता शिवाजी बाविस्कर यांनी 15 हजार रुपये लाच स्विकारण्याची पंचासमक्ष तयारी दर्शविली. त्याप्रमाणे बाविस्कर यांना उर्वरित 15 हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. शिवाजी बाविस्कर यांच्यावर चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी (Addl SP Madhav Reddy)
पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख (DySP Suhas Deshmukh),
पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे (PI Amol Walzade), पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव (PI N.N. Jadhav),
सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, सहायक फौजदार सुरेश पाटील पोलीस अंमलदार बाळु मराठे, राकेश दुसाने, रविंद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनिल वानखेडे, प्रदीप पोळ, अमोल सुर्यवंशी, प्रणेश ठाकुर, सचिन चाटे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mouni Roy | अभिनेत्री मौनी रॉयच्या बिकिनी फोटोंनी लावली सोशल मीडियावर आग; मालदीवमध्ये करतीये व्हेकेशन एन्जॉय

Pune Crime News | अश्विनी क्लासिक सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला शस्त्राचा धाक दाखवून घरफोडी, कोंढव्यातील NIBM Road वरील घटना

Mera Bill Mera Adhikar द्वारे कसे जिंकू शकता १ कोटी रुपयांपर्यंत बक्षीस, जाणून घ्या पूर्ण पद्धत

Janhvi Kapoor | जान्हवीच्या क्रॉप टॉपने वेधले उपस्थितींचे लक्ष; फोटो व्हायरल