ACB Trap On Police Officer | चार्जशीट लवकर दाखल करण्यासाठी लाच घेणारा पोलिस अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap On Police Officer | तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांना अटक करु नये व चार्जशीट लवकर दाखल करण्यासाठी 8 हजार रुपये लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला (ACB Trap On PSI) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Jalgaon ACB Trap) सापळा रचून रंगेहाथ पकडले. जयवंत प्रल्हाद पाटील (PSI Jaywant Prahlad Patil) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. एसीबीच्या पथकाने ही कारवाई मंगळवारी (दि.12) केली. (ACB Trap On Police Officer)

याबाबत धुळे तालुक्यातील अंचाळे येथील 42 वर्षीय व्यक्तीने जळगाव एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्यासह त्यांच्या नातेवाइकांवर पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात तक्रारदार व त्यांच्या नातेवाइकांना अटक न करण्यासाठी, तसेच न्यायालयात दोषारोपपत्र लवकरात लवकर पाठविण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक जयवंत पाटील (Jalgaon Bribe Case) यांनी तक्रारदार यांच्याकडे 30 हजार रुपये लाचेची मागणी केली. (ACB Trap On Police Officer)

जयवंत पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडून यापूर्वी 20 हजार रुपये घेऊन उर्वरित 10 हजार रुपये नंतर घेऊन या असे सांगितले. याबाबत तक्रारदार यांनी जळगाव एसीबी कार्यालयात तक्रार केली. अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली केली असता पोलीस उपनिरीक्षक जयवंत पाटील यांनी 10 हजार रुपये लाच मागून तडजोडी अंती 8 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. पथकाने सापळा रचून जयवंत पाटील यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

Advt.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख, पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव,
अमोल वालझाडे, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सहाय्यक फौजदार सुरेश पाटील,
पोलीस अंमलादर बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे, रवींद्र घुगे, शैला धनगर,
किशोर महाजन, सुनील वानखेडे, प्रदीप पोळ, राकेश दुसाने, प्रणेश ठाकूर आदींनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | मुख्यमंत्री आणि जरांगे यांच्यात मोबाईलवर चर्चा, रात्री उशीरा मंत्री सामंतांनी घेतली भेट

13 September Rashifal : कन्या, तुळ आणि कुंभ राशीला नोकरीसाठी चांगला दिवस, वाचा दैनिक भविष्य

Yashomati Thakur On Navneet Ravi Rana | ‘औकातीत रहायच, माझ्या बापाने आणि आम्ही…’
नवनीत राणांच्या आरोपांवर यशोमती ठाकूर भडकल्या