आणि…. जिमला जाण्याचा ‘तो’ दिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस

सातारा :  पोलीसनामा ऑनलाईन

सातारा येथील फलटण -पंढरपूर मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आहे. या घटनेतील तिघे तरुण जीम करिता चालले असता ट्रकने या तिघांना धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यात तिन्ही तरुणांचा मृत्यू झाला.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, अक्षय नाळे, राहुल नाळे आणि अमित नाळे असे तिघे मित्र बाईकवरुन जिमला जात असताना ट्रकने त्यांना धडक दिली. साताऱ्यातील फलटण-पंढरपूर रोडवर हा अपघात झाला. हे तिघे मित्र वडणीचे रहिवासी असून पिंप्रद गावात जिमसाठी चालले होते.

[amazon_link asins=’B07G5BTYC2,B07437YHXP’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2c88843b-b8d1-11e8-8803-1398637cb731′]

याचवेळी ट्रकने मागून धडक दिल्यानंतर ट्रकखाली चिरडून त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. दरम्यान पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.

नवी दिल्ली : बारा बोटं… बूट होत नाही फिट… तिला मिळाले अनोखे गिफ्ट…