धुळे : मजुर घेऊन जाणाऱ्या बोलेरो गाडीचा भिषण अपघात; 11जण जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – मजुरांच्या गाडीला अपघात झाला अकरा जण जखमी तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहिती नुसार आज शनिवारी सायंकाळच्या वेळी गरताडहुन मजुरांनी भरलेला बोलेरो गाडी यात बारा जण परतीचा प्रवास करत धामणगावला जायला निघाले असता शिरुड चौफुली जवळ समोरुन येणाऱ्या आयशर वाहनाने दिलेल्या हुलकावणीत बोलेरो गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याहुन उलटुन बाजुला खड्यात जाऊन आदळली यावेळी जोरदार आवाज झाल्याने परिसरातील नागरीकांनी गाडी उलटलेली होती. त्या ठिकाणी धाव घेतली. तातडीने 108 रुग्णवाहिकेला बोलवून जखमींना उपचारार्थ चक्करबर्डी येथील डॉ.भाऊसाहेब हिरे वैद्यकीय कॉलेज/ रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. यावेळी प्रा.अरविंद जाधव यांनी जखमी रुग्णांची पहाणी केली. नातेवाईकांना धीर दिला.

अपघातातील जखमींची नावे

1) अशोक अर्जून पाटील  वय.52
2) राहुल महेंद्र पाटील  वय.20
3) समाधान रविंद्र पाटील वय.21
4) शेखर गोकुळ पाटील वय.23
5) कमलेश हंसराज पाटील  वय.20
6) राकेश बन्सीलाल पाटील  वय.40
7) सतिष भटु पाटील  वय.30
8) महेश निंबा पाटील  वय.20
9) मनोहर अशोक पाटील  वय.35
10) श्याम अशोक पाटील  वय.40
11) संभाजी हिंमत पाटील  वय 40
12) सतिष प्रभाकर पाटील  वय.25

शेखर गोकुळ पाटील वय.23 ह्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारार्थ मुंबई येथे नेले.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like