सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार यांची पुण्यात झालेली बदली गृह विभागाकडून रद्द

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पुण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून आलेले सुनील पवार यांची बदली रद्द करण्यात आली आहे. गृहविभागाने काढलेल्या आदेशात ही बदली रद्द करण्यात आली आहे. त्यांची पुण्यात बदली झाल्यानंतर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी विशेष शाखा एक येथे नेमणूक केली होती.

बुलढाणा येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती पोलीस उपअधीक्षक म्हणून सहाय्यक आयुक्त सुनील पवार नेमणुकीस होते. 1 ऑक्टोबर रोजी गृहविभागाने राज्यातील सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या केल्या होत्या. त्यात त्यांची बदली पुण्यात करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची अमिताभ गुप्तां यांनी विशेष शाखेच्या एकपदी नेमणूक केली होती. मात्र गृहविभागाने काल काढलेल्या बदल्यांच्या आदेशात त्यांची बुलढाणा ते पुणे शहर बदली रद्द केली आहे.