आठवड्यात 3 हजार बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – हुल्लडबाजी करणे, ट्रिपल सीट, मोठयाने हॉर्न वाजवणे, वाहन परवाना नसणे यासारख्या वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल तीन हजार ७३ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. ही कारवाई मागील आठ दिवसात करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणे, वाहन चालविण्याचा परवाना वाहनांची कागदपत्रे सोबत न बाळगणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, फॅन्सी नंबर प्लेट, तसेच वाहनांना नंबर प्लेट न लावणे, रस्त्यावर हुल्लडबाजी आणि वाढदिवस साजरे करणे अशा गोष्टींना प्रतिबंध घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी गुंडा स्काॅड पथक तयार केले आहे.

गुंडा स्काॅड पथकामध्ये स्थानिक पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी आणि गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे. हे पथक दररोज सायंकाळी सात ते रात्री बारा या कालावधीत शहरात विशेष गस्त करत आहे. दरम्यान वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. गुरुवार (दि. ९) ते बुधवार (दि. १५) या आठवडाभराच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तीन हजार ७३ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी केलेली कारवाई

भारतीय दंड विधान कलम २७९ – ८१
ट्रिपल सीट – ८७०
विना परवाना, कागदपत्रे नसणे – ६०६
हेल्मेट न घालणे – २६२
मोबाईलवर बोलणे – ३०३
फॅन्सी नंबर प्लेट – १२१
नंबर प्लेट नसणे – १६२
मुंबई पोलीस कायदा कलम ११०, ११२, ११७ अन्वये – ६६८

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like