मुदतबाह्य व वाहतुक नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई

वाहतुक पोलीस आणि आरटीओची संयुक्त मोहिम

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मुदतबाह्य व वाहतुक नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी वाहतुक शाखा व आरटीओकडून संयुक्त मोहिम राबविण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत १२ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शहरातील वाहतुक शाखेक़डून वाहतुक सुरळीत व सुरक्षितपणे चालण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान, वाहनचालकांच्या वाहतुक नियमभंगामुळेच अपघातांचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांकडून वाहतुक नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येते. पोलीस आयुक्त के. वेंकटेशम आणि पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आरटीओ यांनी संयुक्त मोहिम राबविण्यास सुरुवात केली आहे. १८ मार्च पासून मुदतबाह्य आणि इतर वाहतुक नियमभंग करणाऱ्या वाहनांबाबत विशेष मोहिम राबवून १२ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच यापुढेही ही मोहिम राबविण्यात आली आहे.