‘गुलालाई ईस्माईल’ जिने केली होती ‘पाक’ सैन्याच्या ‘लैंगिक शोषणा’ची पोलखोल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानात महिलांवर कशा प्रकारे अत्याचार होतात हे गेल्या अनेक दिवसांपासून समोर येत आहे. अशातच पाकिस्तानची एक तरुणी पलायन करत अमेरिकेत पोचली. तिला पाक अधिकाऱ्यांनी लपतछपत जगण्यास भाग पडलं होतं. पलायन करत ती ऑगस्टमध्ये अमेरिकेत पोहोचली. तिने अमेरिकेकडे राजाश्रयाची मागणी केली. या तरुणीचं नाव आहे गुलालाई ईस्माईल.

गुलालाई इस्माइल

पाकिस्तानातील सैन्याद्वारा होणाऱ्या अत्याचारांचा पर्दाफाश केल्याने पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी तिला निशाणा बनवलं होतं. पाकने तिच्यावर देशद्रोहाचा आरोपही केला होता. त्यानंतर ती अमेरिकेत पळून गेली. रिपोर्टनुसार, गुलालाई सध्या आपल्या बहिणीसोबत ब्रूकलिनमध्ये राहते. परंतु अद्याप तिने हे सांगितले नाही की, ती पळून जाऊन अमेरिकेत कशी पोहोचली. कारण तिचं म्हणणं आहे की, तिने कोणत्याही विमानतळावरून उड्डाण केलेलं नाही.

गुलालाई इस्माइल

गुलालाई म्हणते, “मी तुम्हाला याबाबत जास्त माहिती देणार नाही. देशातून पळून जाण्याची माझी गोष्ट अनेक लोकांचा जीव धोक्यात घालू शकते.” कोणत्याही राजकारण्याने यावर भाष्य करण्यास टाळले नाही. न्यूयॉर्कमध्ये, ईस्माईलने काही प्रमुख मानवाधिकार रक्षणकर्ते आणि कॉंग्रेस नेत्यांच्या कर्मचार्‍यांना भेटण्यास सुरवात केली आहे. पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की गुलालाई ईस्माईलच्या मागे सुरक्षा अधिकारी होते परंतु तिचा शोध लागला नाही.

गुलालाई इस्माइल

गुलालाई ईस्माईलने पाकिस्तानाती सेनेकडून होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या घटनांचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला होता. महिलांविरोधात होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्याने तिच्यावर देशद्रोहाचा आरोप झाला. महिला कार्यकर्त्यांच्या एक समूहाने पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांना पत्र लिहित गुलालाईला सुरक्षा प्रदान करण्याचं अपील केलं होतं. तिच्यावर झालेला देशद्रोहाचा आरोप चुकीचा असल्याचेही तिने सांगितले आहे.

गुलालाई इस्माइल

27 मे रोजी राज्याविरोधी भाषण दिल्याप्रकरणी पश्तून तहफ्फुज चळवळ(पीटीएम) ची कार्यकर्ता गुलालाईला इम्रान खान यांनी ब्लॅक लिस्ट केलं होतं. तिच्यावर दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत देशद्रोहाचे आरोप लावण्यात आले आहेत.

गुलालाई इस्माइल

खैबर पख्तूनख्वाची रहिवासी असलेल्या ईस्माइलने वयाच्या 16 व्या वर्षी अल्पवयीन मुलींच्या शिक्षण आणि हक्कांसाठी स्वयंसेवी संस्था सुरू केली. 2013 साली तिने 100 महिलांची एक टीम बनवली होती जी घरगुती हिंसाचार आणि बालविवाह यांसारख्या मुद्द्यांवर काम करेल. आपल्या कार्यासाठी तिला पुरस्कारही मिळाले आहेत.

गुलालाई इस्माइल

Visit – policenama.com