Coronavirus : अभिनेता अर्जून कपूर ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, इस्टाग्रामवर पोस्ट करून सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता अर्जून कपूरला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. याबाबत त्यानं स्वतः त्याच्या इस्टाग्राम अकाऊंटरवर पोस्ट करून माहिती दिली आहे. आपण स्वतः होम क्वारंटाईन झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

अर्जून कपूरनं त्याच्या इस्टाग्रामच्या पोस्टमध्ये म्हंटलं आहे की, मी कोरोना पॉझिटिव्ह आहे हे तुम्हा सर्वांना सांगणं माझं कर्तव्य समजतो. मी सध्या बरा असून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली होम क्वारंटाईन झालो आहे. मी तुम्हा सर्वांना मला सपोर्ट करीत असल्याबद्दल अ‍ॅडव्हान्समध्ये धन्यवाद म्हणतो आहे. माझ्या प्रकृतीबाबतचे अपडेट मी देत राहणार आहे.