गांधींच्या अहिंसावादी तत्वापेक्षा सावरकरांचे तत्व अधिक श्रेष्ठ : शरद पोंक्षे

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ आणि कल्याण विकास फाऊंडेनच्या वतीने आज 31 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन समारोप सोहळा पार पडला. या संमेलनाची सांगता आज कल्याणच्या ओक हायस्कूलच्या सभागृहात झाली. शिवरायांच्या हातात शस्त्र होतं म्हणूनच ते अफजलखानाचा वध करू शकले, त्यामुळे गांधीजींच्या अहिंसावादी तत्वापेक्षा सावरकरांची तत्वं अधिक श्रेष्ठ होती, असे मत अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर ब्राह्मण होते, म्हणून त्यांना विरोध झाला. ते अन्य जातीचे असते तर त्यांना विरोध झाला नसता, असे मत व्यक्त करत पोंक्षे म्हणाले, सावरकर आणि त्यांच्या पत्नीने कधीही जातीभेत मानला नाही. सावरकर यांना वाचल्यानंतर असं लक्षात येतं की ज्या माणसाने जात हा शब्द संपुष्टात आणण्यासाठी आयुष्य झिझवलं त्याच माणसाला ब्राह्मण या तीन अक्षरामध्ये बंदिस्त करून टाकले, अशी खंत पोंक्षे यांनी व्यक्त केली.

सावरकर ब्राह्मण होते म्हणून त्यांना विरोध होत आहे. अन्य जातीचे असते तर त्यांना विरोध झाला नसता, यामागे जातीयवादाचं राजकारण आहे. ते पुढे म्हणाले, मराठी ही सर्वश्रेष्ठ भाषा आहे, असे म्हटल्याने इतर भाषांचा अपमान होत नाही. गर्व से कहो हम हिंदू है असे म्हटल्याने दुसऱ्या धर्माचा अपमान होत नाही. हिंदू धर्मासारखा दुसरा सेक्युलर धर्म नाही. हिंदू असणं म्हणजेच सेक्युलर असणं आहे, हिंदू असणं हेच माणूस असणं आहे, असे पोंक्षे यांनी यावेळी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/