अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा नवरा घेतो तिची खास काळजी, KISS करताना अडचण नको म्हणून करतो ‘हे’ काम !

पोलिसनामा ऑनलाइन –लॉकडाऊनमुळं घरात बंद असणारे कलाकार आता सोशल मीडियावर टाईम घालवताना दिसत आहेत. अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हिनं नुकताच इंस्टाग्रामवर लाईव्ह येऊन चाहत्यांसोबत संवाद साधला. यावेळी तिचा पती विवेक दहिया हा देखील उपस्थित होता. यावेळी कपलनं चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.

विवेकनं एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की, तो आपली पत्नी दिव्यांकामुळं दाढी ठेवत नाही. त्याचं दिव्यांकावर खूप प्रेम आहे. त्याला वाटतं की, त्याला किस करण्यात तिला कोणताही त्रास होऊ नये. विवेकचं हे बोलणं ऐकल्यानंतर मात्र दिव्यांका हसू लागते. यावर हसता हसात ती म्हणते, हो हा थोडा Kiss-Friendly आहे.

दिव्यांका आणि विवेक यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर 33 वर्षी दिव्यांका आणि विवेक ये है मोहब्बते च्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघांनीही जानेवारी 2016 मध्ये साखरपुडा केला होता. भोपाळमध्ये दोघं विवाहबद्ध झाले होते. यानंतर चंदीगढमध्ये रिसेप्शन झालं होतं.

दिव्यांकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोालयचं झालं तर जेव्हा टीव्हीवर रामायणचा रिमेक बनवण्यात आला होता तेव्ही दिव्यांका त्रिपाठी हिला निवडण्यात आलं होतं. 2012 मध्ये ही मालिका प्रसारीत झाली होती. तिनं ये हैं मोहब्बतें मालिकेत डॉ. इशिताचा रोल केला होता. यातून तिनं आपली ओळख तयार केली होती. यातून तिला खूप लोकप्रियता मिळाली आहे.