Actress Kangana Ranaut | अभिनेत्री कंगना राणौतचा नवा चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रिलीज डेट आली समोर

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची पंगा क्वीन अभिनेत्री कंगना राणौत (Actress Kangana Ranaut) ही नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे व वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अभिनेत्री कंगनाच्या चित्रपटातून हे नेहमीच हटकी स्टोरी व जबरदस्त अभिनयाची मेजवानी प्रेक्षकांना मिळते. कंगनाच्या निर्मिती संस्थेचा ‘टीकू वेड्स शेरू’ (Tiku Weds Sheru) हा चित्रपट ओटीटी वर प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या यशानंतर कंगनाने दुसऱ्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करत नवीन चित्रपटाची रिलीज डेट सांगितली आहे. अभिनेत्री कंगना राणौतच्या (Actress Kangana Ranaut) बहुप्रतिक्षित तेजस चित्रपटाचे पोस्टर तिने पोस्ट केले आहे.

अभिनेत्री कंगना राणौतने तिच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या तेजस चित्रपटाचे दोन पोस्टर रिलीज (Tejas Movie Poster Out) केले आहेत. तिने या आधीही या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले होते मात्र यावेळी तेजस चित्रपटाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्याच्या 20 तारखेला हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. (Tejas Movie Release Date) या मध्ये भारतीय हवाई दलाची गौरवगाथा (Indian Air Force) असणार असल्याचे पोस्टर वरुन कळत आहे. यामधील एका पोस्टरमध्ये अभिनेत्री कंगना भारतीय हवाई दलाच्या युनिफॉर्म दिसत असून एयरक्राफ्ट मधून चालत येताना दिसत आहे. तर तेजस चित्रपटाच्या (Tejas Movie) दुसऱ्या पोस्टरमध्ये कंगना ॲक्शनमोडमध्ये दिसत असून तिच्या मागे जळती कार दिसत आहे. या पोस्टला कंगनाने “आमच्या शूर हवाई दलाच्या वैमानिकांच्या शौर्याला सलाम. तेजस 20 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे” असे कॅप्शन दिले आहे.

अभिनेत्री कंगना राणौतचा (Actress Kangana Ranaut) बहुचर्चित ‘तेजस’ चित्रपट 20 ऑक्टोबरला रिलीज होणार असून याच दिवशी अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) व क्रिती सेनॉनचा (Kriti Sanon) गणपथ सिनेमा (Ganapath – Part 1 Movie) देखील प्रदर्शित होणार आहे. या दोन्ही सिनेमांमध्ये जबरदस्त ॲक्शन व थ्रिलर पाहायला मिळणार आहे. (Ganpat Movie Release Date) त्यामुळे कंगनाच्या तेजस तर टायगरच्या गणपथ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार टक्कर होणार आहे. (Tejas Clashes Ganapath) याआधी कंगनाचा ‘इमरजेंसी’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट 20 ऑक्टोबरला येणार होता. (Emergency Movie) मात्र कंगनाने तो पोस्टपॉन्ट केला व त्या ऐवजी तिचा ‘तेजस’ चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे तिने सोशल मीडियावर जाहीर केले आहे.

Web Title : Actress Kangana Ranaut | kangana ranaut announces tejas release date clashes with tiger shroff ganpath

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nandurbar Police News | नंदुरबार पोलिसांचे श्रमदान, चाँदसैली घाटाने घेतला मोकळा श्वास

Maharashtra Municipal Elections | विरोधकांची ताकद दुभागल्याने ऑक्टोबरमध्ये महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता

Pune PMC News | समाविष्ट 34 गावांतील विकासकामांचा अहवाल तयार करण्याच्या समितीमध्ये 12 जणांना संधी मिळणार

Maharashtra Political Crisis | ‘शिवसेनेतील बंडखोर उद्धव ठाकरेंकडे परत जाऊ शकतात, कारण…’, भाजप खासदाराचा खळबळजनक दावा

Maharashtra Political Crisis | शिंदे गटात नाराजी, विश्वासात न घेता राष्ट्रवादीला सोबत घेतलं; बच्चू कडूंनी बोलून दाखवली खदखद