भाजपचं मिशन ‘साऊथ’, ‘या’ प्रसिध्द अभिनेत्रीची BJP मध्ये ‘एन्ट्री’

चेन्नई : वृत्तसंस्था – भाजपचे  कार्यकारी अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या उपस्थितीत अभिनेत्री नमिता हिने भाजप पक्षात प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाने ‘मिशन दक्षिण’ अंतर्गत तमिळनाडूमध्ये आपला प्रभाव वाढवायला सुरुवात केली आहे.  जगत प्रकाश नड्डा शनिवारी एकदिवसीय चेन्नई दौर्‍यावर आले होते. यावेळी  अभिनेत्री नमिता यांना पक्षाचे सदस्यत्व देण्यात आले.  या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

चेन्नई येथे झालेल्या बैठकीत भाजपाचे कार्याध्यक्ष जगत प्रकाश नड्डा म्हणाले की, ‘तुम्ही लोकांनी तमिळनाडूचे भवितव्य बदलण्याचे ठरविले आहे. येत्या काळात भाजप हा इथला बळकट राजकीय पक्ष होईल. ‘

अभिनेत्री नमिताने बिल्ला, इंग्लिशकरन, ‘जगन मोहिनी’ या चित्रपटांत प्रमुख भूमिका केल्या आहेत. नमिताने 2001 साली मिस सुरतचे विजेतेपद जिंकले होते. नमिता 2001 साली मिस इंडियाची रनरअप राहिली होती.  नमिताची दक्षिणेत फॅन फॉलोइंग मोठी आहे.

Visit : Policenama.com