प्रेग्नेंसीमध्ये गरीब मुलांना भेटली ‘ही’ अभिनेत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रेस, डरना मना है, नो एन्ट्री अशा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये चमकलेली अभिनेत्री समीरा रेड्डी सध्या आपली प्रेग्नेंसी एन्जॉय करीत आहे. समीरा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. तिने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम पेजवर तिचे बेबी बंप फ्लॉन्टचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती मुंबईतल्या एका फाउंडेशनच्या मुलांची तिने भेट घेतल्याचे दिसत आहे. यावेळी तिने तेथील मुलांसोबत वेळ घालवला.

तिने या चिमुकल्या मुलांचे भरभरून आशीर्वाद घेतले यावेळी फोटो शेअर करताना ती म्हणाली दुपारचा वेळ मी या गोड मुलींसोबत व्यतीत केला. या मुलांची एनर्जी खूप भारी असल्याचे तिने फोटो शेअर करतानाच्या कंमेंट मध्ये म्हंटले आहे.

समाराने २०१४१ साली बिझनेसमन अक्षय वरदेसोबत लग्न केले. यापूर्वी २०१५ साली तिने एका मुलाला जन्म दिला. लग्न आणि मुलगा झाल्यानंतर तिने संसारात लक्ष देत बॉलीवूड मधून रजा घेतली आहे. समीराने २००२ साली मैंने दिल तुझको दिया चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

यापूर्वी समीराने आपल्या इंस्टाग्राम वरून बेबी शॉवर सोहळयाचे फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये तिचा मित्रपरिवार आणि कुटुंबीय होते. तिचे बेबी शॉवर पिंक स्नोफ्लेक थीम वर करण्यात आले होते. या फोटोंमध्ये समीरा खूप आनंदी दिसत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like