सुनील ग्रोवरच्या रिअ‍ॅलिटी शोमधून अभिनेत्री शिल्पा शिंदेचा काढता पाय

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शिंदे ही सुनील ग्रोवरच्या गॅग्स ऑफ फिल्मिस्तान या रिअ‍ॅलिटी शोतून बाहेर पडली. या संदर्भात शिल्पा म्हणाली की, “सुनील मला ज्युनिअर आर्टिस्टसारखी वागणूक देत होता. ‘पिंकव्हिला’नुसार, शोच्या चित्रीकरणावेळी सुनीलने ज्युनिअर आर्टिस्टप्रमाणे वागणूक दिली. त्याचबरोबर तो स्वत:शिवाय कोणालाच लाइमलाइटमध्ये येऊ देत नव्हता असेही शिल्पाने म्हटलं आहे.”

शिल्पा सांगितले की, “ज्यावेळी मला निर्मात्यांचा फोन आला, त्यावेळी त्यांनी असं सांगितलं होतं की, सुनील या कार्यक्रमाचा भाग नाही. त्यामुळे मी या कार्यक्रमात सहभागी झाले. परंतु, प्रत्यक्षात सुनीलदेखील या कार्यक्रमात आहे हे मला नंतर समजलं. म्हणजेच शो मेकर्स माझ्याशी खोटं बोलले होते”, असं शिल्पा म्हणाली.

शिल्पा सांगते की, “यापूर्वी सुनील आणि मी एका कार्यक्रमात जिओसाठी काम केलं होतं. तेव्हा सुनीलने मला केवळ शोभेची बाहुली म्हणून उभं केलं होतं. त्यावेळी मी त्यांची फॅन होते आणि रिलायन्सकडूनदेखील या शोसाठी चांगलं मानधन मिळालं होतं. त्यामुळे मी हे काम केलं. त्यानंतर गॅग्स ऑफ फिल्मिस्तानचा प्रोमो पाहूनदेखील मी नाराज झाले होते. या प्रोमोमध्येदेखील सुनीलचं लाइमलाइटमध्ये होता. पण सुनील एक सिनिअर अ‍ॅक्टर आहेत. त्यांनी ते स्थान मिळवलं आहे असं म्हणून मी दुर्लक्ष केलं. मात्र दुसऱ्या प्रोमोमध्येदेखील तेच पाहायला मिळालं. त्यामुळे या सगळ्या मी कंटाळे आणि त्यांनी केवळ प्रसिद्धीसाठी माझा वापर केलाय हे माझ्या लक्षात आलं”