बटरच्या अतिवापरामुळे होऊ शकतो त्रास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोणी किंवा बटरमध्ये सॅच्युरेटेड फॅट मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळं धमन्या बंद होऊन विविध शारीरीक समस्या उद्भवू शकतात. दररोजच्या आहारामध्ये मोठ्या प्रमाणावर बटरचा समावेश केल्यास प्लाक बिल्ड-अपचं कारण ठरू शकतं. शिवाय बाजारामध्ये मिळणाऱ्या बटरच्या विविध ब्रँड्समध्ये मोठ्या प्रमाणावर मीठ आणि आर्टिफिशिअल फ्लेवर्स असतात. काहीजण पदार्थाची चव वाढविण्यासाठी त्यामध्ये बटर किंवा लोणी एकत्र टाकातात.

दाल मखनी, पनीर बटर मसाला, बटर पराठा या पदार्थांमध्ये अशाच प्रकारे बटर आणि लोणी एकत्र करून वापरलं जातं. बाजारात मिळणारं बटर हे अपेक्षेपेक्षा जरा जास्तच खारट असल्यानं हाय ब्लड प्रेशरच्या लोकांना त्रास होऊ शकतो. जीभेचे चोचले पुरवण्यासाठी काहीजण या धोक्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, असा धोका पत्करण्यापेक्षा चवीशी तडजोड न करता बटरऐवजी स्वयंपाकघरातील अन्य पदार्थ वापरून स्वतःला हेल्दी ठेवू शकतो.

तूपाला आयुर्वेदामध्ये खूप महत्व आहे. प्राचीन काळापासूनच तूप आरोग्यवर्धक मानलं जातं. तूप आहारामध्ये योग्य प्रमाणात वापरल्यास हृदय रोगाचा धोका कमी होऊ शकतो, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. तूपामध्ये असलेलं कॉन्जुगेटिड लिनोलिक अ‍ॅसिड हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी मदत करतं. टाइप टू डायबिटीजने पीडित असणाऱ्या व्यक्तींमध्ये याचा धोका अधिक असतो.

तांदळासारख्या कार्बोहायडेट कमी प्रमाणात असणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये तूपाचा समावेश केल्याने त्यांच्यामध्ये असणारी साखर पचवण्यासाठी मदत करतं. उत्तर भारतामध्ये हे थोडं विचित्र वाटत असलं तरिही दक्षिण भारतामध्ये मात्र जेवण तयार करण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करण्यात येतो. खोबरेल तेल पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी फायदेशीर ठरतं. नारळाचं तेल सेबमप्रमाणे असतं. जे शरीरामध्ये एक तेल तयार होत असतं. जे स्काल्प सुकण्यापासून होण्यापासून वाचवतं.

एवढचं नाही तर केसांच्या मुळांना नुकसान पोहोचवत नाही. नारळाच्या तेलाचा वापर केल्याने वजन कमी होतं. ताज्या खोबरेल तेलामध्ये इतर तेलांपेक्षा जास्त प्रमाणात मीडियम चेन फॅटी अ‍ॅसिड (७० ते ८५ टक्के) असतं. मीडियम चेन फॅटी अ‍ॅसिड अगदी सहज ऑक्सीडाइज्ड लिपिड्स होतात आणि एडीपोज ऊतकमध्ये संग्रहित होत नाही. याप्रकारे मुख्य स्वरूपात मीडियम चेन फॅटी अ‍ॅसिडयुक्त नारळाचं तेल वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. ऑलिव्ह ऑइलचा वापर केल्याने अनेक आजार दूर करण्यास मदत होते.