पुण्यात कामगार कुटूंबाच्या मदतीला धावले आदित्य ठाकरे अन् पुणे पोलिस

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  –  पुण्यातील एका कामगार कुटुंबाच्या मदतीला पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे व पुणे पोलीस धावून आले. लॉकडाऊनमुळे हे कुटुंब उपाशी होते. त्यांना एक महिन्याचे धान्य वाटप करण्यात आले.

कोंढवा परिसरात महम्मद येथील कृष्णा नगर येथे एका बिहार येथील कुटुंब राहते. दोनच महिन्यांपूर्वी हे कुटुंब पुण्यात आले आहे. त्यांची चार मूल आणि दाम्पत्य राहते. मोलमजुरी करून हे कुटुंब आपले घर चालवतात. पण, लॉकडाऊनमुले त्यांची कामे बंद झाली आणि त्यांच्या खाण्या-पिण्याची आबाळ सुरू झाली. अनेकांकडून मदत करण्यात येत आहे. पण 6 जणांचं हे कुटुंब त्यापासून वंचित राहिले. त्यांची येथे कोणाशी ओळख नाही आणि जास्त काही माहितीही देखील नव्हते.

त्यामुळे येथील एका व्यक्तीने महिलेला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून दिला. तसेच मदतीची मागणी केली. त्यावेळी त्यांनी पुण्यातील युवती सेनाच्या पुणे जिल्हा समन्वयक मनिषा धारणे यांना या कुटुंबाला त्वरित मदत करण्यास सांगितले.

त्यानंतर मनिषा धारणे व युवती सेनेने या कुटुंबासोबत संपर्क साधला असता. त्यावेळी त्यांना मदत काय पाहीजे असे विचारले असता त्यांनी आम्ही दोनच महिन्यापूर्वी पुण्यात आलो. आल्यानंतर 10 दिवसात लॉकडाऊन झाले आणि होते तेही पैसे संपले. त्यामुळे खाण्याचे खूप हाल होत असल्याचे सांगितले.
शहरात संचारबंदी असल्याने मदत घेऊन जाणे शक्य नव्हते. त्यामुळे धारणे यांनी पूर्वी वानवडी पोलीस ठाण्यात असणारे व सध्या सायबर सेल येथील पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांच्याशी संपर्क साधला तसेच त्यांना मदत द्यायची असून आम्हाला मदत घेऊन जाता येत नसल्याची अडचण सांगितली. तसेच त्यांना पूर्ण माहिती दिली. त्यांनतर त्यांनी लगेचच वानवडी पोलीस स्टेशन मधील नासेर देशमुख यांच्याशी संपर्क साधला. त्यांना मदत पोहचती करण्यास सांगितले. त्यांना पूर्ण किराणा मालाची यादी व ऑनलाइन पैसे पाठविले. देशमुख यांनी हे साहित्य या कुटुंबाच्या घरी पोहचते केले.त्यावेळी या कुटुंबाने आदित्य ठाकरे, पुणे पोलीस आणि युवती सेनेचे मनःपूर्वक आभार मानले.