वरळीमधून आदित्य ठाकरे 30 हजार मतांनी आघाडीवर

वरळी : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळीमधून 30 हजार मतांनी मोठी आघाडी घेतली आहेत. मतमोजणीच्या सुरवातीपासूनच आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत. ठाकरे घराण्यातील पहिले ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. वरळीचे विद्यमान आमदार सुनील शिंदे यांच्याऐवजी शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना वरळीतून उमेदवारी दिली आहे.

वरळी मतदारसंघात शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. सुरेश माने यांच्यात प्रमुख लढत होत आहे. या मतदारसंघातून बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेही निवडणूक लढवत आहे. आदित्य ठाकरे हे निवडणूक रिंगणात असल्यानं ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.

वरळी मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. 2009 ची निवडणूक वगळता 1990 पासूनच्या सहा निवडणुकीत इथे शिवसेनेचाच उमेदवार निवडून आला आहे. 2014 रोजी या मतदारसंघात 55.75 टक्के लोकांनी मतदान केलं होतं तर यावेळी ही टक्केवारी 50.20 वर आली असल्याने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदानाच्या टक्केवारीत 5.55 टक्‍क्‍यांची घसरण झाली आहे.

टीप : हा अंतिम निकाल नाही. आणखी मतमोजणी चालू असून अजून अनेक फेऱ्या बाकी आहेत

Visit : Policenama.com