Aditya Thackeray | शिवसेना-मनसे वाद पोहोचला अयोध्येत; ‘असली आ रहा है, नकली से सावधान’चे बॅनर झळकले’

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – Aditya Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी हिंदुत्वाची (Hindutva) भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवसेना (Shivsena)- मनसे (MNS) वादात आणखी भर पडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्येला (Ayodhya) जाणार आहेत. मात्र तत्पूर्वी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हेदेखील अयोध्येला जाणार असल्याने अयोध्येत बॅनरबाजी सुरू झाली आहे. ‘असली आ रहा है, नकली से सावधान’ अशा आशयाचे बॅनर शिवसेनेकडून लावण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेना-मनसे वाद थेट अयोध्येत पोहोचल्याची चर्चा सुरू झाली आहे.

 

अयोध्येत जो बॅनर झळकला आहे. त्यावर शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे (Late. Balasaheb Thackeray), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. राज यांनी हिंदुत्त्वाची भूमिका घेतली आहे. त्यांची ही भूमिका नकली असल्याचे शिवसेनेकडून सूचित करण्यात आले आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर झाली नसली तरी राज ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी ते अयोध्येला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. अयोध्येतील भाजपच्या (BJP) स्थानिक नेत्यांनी राज यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. त्यातच शिवसेनेने राज ठाकरे यांच्या हिंदुत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

 

माफी मागण्यावरून वाद उफाळला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी परप्रतियांचा मुद्दा लावून धरला होता. त्यावरून राज ठाकरे जो पर्यंत उत्तर भारतीयांची (North Indian) माफी मागत नाही तो पर्यंत त्यांना अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही असा इशारा भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह (BJP MP Brijbhushan Singh) यांनी दिला आहे. अयोध्येत जागोजागी या मागणीचे बॅनर झळकले आहेत. राज ठाकरे 5 जूनला अयोध्येला जाणार आहेत. खासदार सिंह यांच्या भूमिकेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी सिंह यांना समजावले असून ते शांत झाले आहेत, असा दावा मनसेचे नेते अभिजीत पानसे (MNS Leader Abhijeet Panse) यांनी दोन दिवसांपूर्वी केला.

 

राज यांना अयोध्येत येण्यापासून रोखणार

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार ब्रिजभूषण सिंह यांनाही 5 जूनला ‘चलो अयोध्या’ अशी हाक दिली आहे.
त्या दिवशी राज यांनी अयोध्येत येण्यापासून रोखण्यात येणार आहे.
राज जो पर्यंत उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागत नाही तोपर्यंत योगी आदित्यनाथ यांनी त्यांना भेटू नये.
राम मंदिर आंदोलनाशी (Ram Mandir Andolan) ठाकरे कुटुंबाचा काडीचाही संबंध नाही.
रा. स्व. संघ (RSS) आणि विश्व हिंदू परिषदेचे (Vishwa Hindu Parishad) योगदान आंदोलनात होते असे खा. सिंह यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सिंह यांच्या समर्थकांनी आता राज यांच्याविरोधात अयोध्येत बॅनर युद्ध छेडले आहे.

 

Web Title :- Aditya Thackeray | real is coming beware of fake shivsena mns raj thackeray dispute reaches ayodhya

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा