Aditya Thackeray | पळून गेलेत त्यांच्यातही दोन गट, लवकरच समोर येईल – आदित्य ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Aditya Thackeray | शिवसेनेचे (Shivsena) युवानेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पक्ष बळकट करण्यासाठी निष्ठा यात्रा सुरू केली आहे. या यात्रेदरम्यान आदित्य यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. आज त्यांनी निष्ठा यात्रेत दहिसर येथे बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेताना एक मोठे वक्तव्य केले आहे. बंडखोरीसाठी पळून गेलेल्या आमदारांमध्ये सुद्धा दोन गट असून लवकरच ते समोर येतील असे आदित्य यांनी म्हटल्याने राजकीय चर्चा रंगली आहे.

 

निष्ठा यात्रेत पदाधिकारी आणि शिवसैनिकांशी संवाद साधताना आदित्य म्हणाले, जे गेले त्यांना एकच निरोप द्यायचा आहे. जिथे तुम्ही गेलात तिथे आनंदी रहा, सुखी रहा. तुमच्या बद्दल राग, द्वेष नाही. दु:ख निश्चित आहे की आम्ही तुम्हाला शिवसैनिक समजायचो. तुमच्यावर विश्वास ठेवला होता. आता इतकेच सांगायचे आहे की, थोडी जर लाज उरली असेल, हिंमत उरली असेल तर पुन्हा आमदार होण्यासाठी राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे जा आणि मग जनता जो निकाल देईल तो मला मान्य आहे. (Aditya Thackeray)

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, जे गेले ते गेले, त्यांच्याबद्दल बोलणार नाही. त्यांच्यात पण दोन गट आहेत, जे लवकरच कळतील.
कारण, एक गट असा आहे ज्याला खरोखर जायचे होते.
त्यांना यातच आनंद मिळतो की हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून खाली उतरवले.
काही लोकांच्या राक्षसी महत्वकांक्षा असतात. काही लोकांना तुम्ही कितीही दिले तरी समाधान नसते.
पण दुसरा गट असा आहे ज्याला पळवून नेले. ते आपल्याला लवकरच समजेल.

 

ज्यांना परत यायचे आहे, त्यांना मातोश्रीचे दरवाजे नेहमीप्रमाणे खुले आहेत. आमचे मन मोठे आहे.
जसा त्यावेळी आम्ही विश्वास ठेवला तसाच विश्वास आम्ही प्रत्येक शिवसैनिकावर टाकत असतो.

 

बंडखोरांना मात देण्यासाठी शिवसेनेचा फॉर्म्युला ठरला असून यासाठी आदित्य ठाकरे मुंबईतील तब्बल 236 शाखांमध्ये आणि बंडखोर आमदारांच्या मतदार संघांचा दौरा करणार आहेत.
प्रत्येक शाखेत जाऊन ते शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.
शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याचा ते प्रयत्न करणार आहेत.

 

Web Title :- Aditya Thackeray | shiv sena aditya thackeray has said that there are two groups among the mlas who have fled

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा