Coronavirus : ‘वरळी’त ’कोरोना’चा धोका आणखी वाढला

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यासह मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणूने शनिवारी मुंबईत चार जणांचा बळी घेतला. त्यामुळे एकट्या मुंबईत मृतांचा आकडा 22 वर पोहोचला आहे. त्यात राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदार संघ असलेल्या वरळी भागात आणखी कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. मुंबईत शनिवारी 52 नवे रुग्ण आढळले. त्यात एकट्या वरळी, जिजामात नगरातील 17 रुग्णांचा समावेश आहे. मुंबईतील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 330 झाली आहे.

महापालिकेने वरळी, जिजामाता नगर परिसरातील 135 जणांना क्वारंटाईन केले आहे. यापूर्वी वरळीतील कोळीवाड्यात 18 कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. जिजामाता नगर मधल्या या रुग्णांना परळ येथील रहेजा आणि पोद्दार हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. कोळीवाड्यातील 500 नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. त्यातही सर्वात जास्त धोका मुंबईला निर्माण झाला आहे. असे असतानाही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध असलेल्या धारावीमध्ये आतापर्यंत तीन कोरोना पॉझिटिव्ह केसेस सापडल्या आहेत. त्यापैकी पहिल्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्याचे थेट कनेक्शन दिल्लीत निजामुद्दीन इथे पार पडलेल्या तबलिगी जमासोबत असल्याचे उघड झाले आहे.

निजामुद्दीन मरकजमध्ये उपस्थित असलेल्यांपैकी 10 लोकांपैकी 6 जण मुंबईतील धारावी परिसरात राहात होते. त्यापैकी चार लोक सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये वेगवेगळ्या भागांत ते राहत आहे. त्यापैकी 2 लोकांचा पोलीस प्रशासनाकडून शोध सुरू आहे. अद्यापही हे दोन जण सापडू शकले नाहीत. त्यामुळे मुंबईचा धोका वाढला आहे. धारावीमध्ये 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. हा व्यक्ती तबलिगी जमातच्या लोकांना भेटला होता. त्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर तबलिगी जमातचे 4 जण केरळमध्ये गेले होते.