अडगळीत सापडलेले अडवाणी, जोशी, एकनाथ खडसे भाजपचे स्टार प्रचारक

महाराष्ट्रात करणार भाजपचा प्रचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – वाढत्या वयामुळे तिकीट कापलेले भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरलीमनोहर जोशी महाराष्ट्रात भाजपचा प्रचार करणार आहेत. भाजपने आपल्या लोकसभा निवडणूकीचा प्रचार करण्यासाठी देशभरातील पहिल्या फळीतील आणि राज्यातील ४० नेत्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात या दोन ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे.

लोकसभा निवडणूकीच्या आपल्या उमेदवारांची यादी भाजपने जाहीर केली आहे. अद्याप बरीच लोकं प्रतिक्षेत आहेत. मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे गांधीनगर येथील तिकीट कापून भाजचे अध्यक्ष अमित शहा यांना तेथून उमेदवारी देण्यात आली. पहिल्या फळीतील नेते लालकृष्ण अडवाणी यांना डावलण्यात आल्याने अनेक वावड्या उठल्या होत्या. त्यावर त्यांचं वय झाल्याने त्यांचं तिकीट कापलं असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. मात्र त्यांचं वय झालेलं असलं तरी महाराष्ट्रात मात्र ते कॅम्पेनिंग करण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.

हे ४० नेते करणार महाराष्ट्रात कॅम्पेनिंग

नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, सुरेश प्रभू, रामलाल, सरोज पांडे, वसुंधरा राजे, योगी आदित्यनाथ, शानवाज हुसेन, विजया रहाटकर, चंद्रकांतदादा पाटील, विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुरजीतसिंह ठाकूर, आशिष शेलार, मधू चव्हाण, माधवी नाईक, गिरीष महाजन, रणजीत पाटील, अमित शहा, मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज, देवेंद्र फडणवीस, पियूष गोयल, प्रकाश जावडेकर, व्ही. सतीश, शिवराजसिंह चौहान, मुख्तार अब्बाल नक्वी, राजीव प्रताप रुडी, स्मृती इराणी, पुनम महाजन, सुधीर मुनगंटीवार, एकनाथ खडसे, विजय पुराणिक, अतूल भातखळकर, जमाल सिद्दीकी, माधव भंडारी, संभाजी पाटील निलंगेकर, राम शिंदे