दिल्लीकडे येणारं विमान अफगानिस्तानामध्ये कोसळलं, 110 प्रवाशी करत होते प्रवास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अफगाणिस्तानात एक प्रवासी विमान कोसळले आहे. पूर्व गझनी प्रांतात सोमवारी दुपारी 1.30 वाजता एरियाना अफगाण एअरलाइन्सचे विमान कोसळले. महत्वाचे म्हणजे, ज्या ठिकाणी हा विमान अपघात झाला, ते क्षेत्र तालिबान्यांच्या नियंत्रणाखाली आहे. दरम्यान, अद्याप मृतांची कोणतीही माहिती मिळालेली नाही.

हेरात विमानतळावरील कंट्रोल टॉवरच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान एरियाना अफगाण एअरलाइन्सचे होते. 110 प्रवासी संख्या असणारे हे विमान हेरात ते दिल्लीकडे उड्डाण करत होते.