काबुलमधील लग्न समारंभातील बॉम्बस्फोटात ४० ठार

काबुल : वृत्तसंस्था – अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये शनिवारी रात्री एका लग्न समारंभात आत्मघाती बॉम्बस्फोट होऊन त्यात ४० जण ठार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून १०० हून अधिक जखमी झाले आहेत. या हल्ल्यात अनेक लहान मुलांचा मृत्यु झाला आहे.

काबुलमधील पश्चिमेकडील दुबई शहरात एका लग्नसमारंभाच्या हॉलमध्ये हा बॉम्बस्फोट घडविण्यात आला आहे. समारंभाला एक हजाराहून अधिक लोक उपस्थित होते.

याबाबत अफगाणिस्तानच्या गृहमंत्रालयाने सांगितले की, हा आत्मघाती हल्ला शनिवारी रात्री स्थानिक वेळेसुमार साडेदहा वाजता करण्यात आला. (भारतीय वेळेनुसार रविवारी मध्यरात्री साडेबारा) या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने घेतलेली नाही. त्यामुळे यामागे कोणाचा हात आहे, हे अद्याप स्पष्ट होत नाही.

लग्नसमारंभ सुरु असताना आत्मघाती स्टेजच्या जवळ आला. ज्या ठिकाणी म्युझिशियन उपस्थित होते. त्यांच्याजवळ जाऊन त्याने स्फोट घडवून आणला. या स्फोटात किमान ४० जण ठार झाल्याचे सांगितले जात आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या परिसरात अल्पसंख्यांक शिया हजारा समुदायाचे लोक अधिक प्रमाणात राहतात. त्यामुळे त्यांना टारगेट करण्यासाठी हा बॉंम्बस्फोट घडवून आणला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

आरोग्यविषयक वृत्त –