सलमान खानच्या ‘या’ सिनेमाचा तब्बल १६ वर्षांनंतर येणार सेकंड पार्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या करिअरच्या काळात एक काळ असा होता की, सलमान खान फॅमिली ड्रामाचा चेहरा होता. यानंतर २००३ मध्ये आलेला सिनेमा ‘तेरे नाम’ने सलमान खानच्या करिअरची दिशा बदलली. एका पजेसिव प्रियकराची सलमानने साकारलेली भूमिका सर्वांनाच भावली होती. या सिनेमातील सलमानची हेअर स्टाईलदेखील चांगलीच गाजली. सलमानच्या अनेक चाहत्यांनी ही हेअरस्टाईल फॉलो केली होती. आता तब्बल १६ वर्षांनंतर या सिनेमाचे दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी या सिनेमाचा सीक्वलबाबत घोषणा केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तेरे नाम या सिनेमाच्या सीक्वलमध्ये पात्रांचं नाव तेच असेल परंतु सलमान आणि सतीश यांची जोडी पुन्हा एकत्र काम करेल किंवा नाही, किंवा नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही. सतीश कौशिक आणि सलमान खान यांनी नुकतंच भारत या सिनेमात एकत्र काम केलं आहे.

सतीश कौशिक यांनी एका वृत्तसमूहाशी बोलताना तेरे नाम या सिनेमाच्या सीक्वल बाबत माहिती दिली आहे. सतीश कौशिक म्हणाले की, “होय, मी तेरे नाम चा सेकंड पार्ट बनवणार आहे. ही एक लव्ह स्टोरी असणार आहे. यापेक्षा जास्त काही मी आता सांगू शकत नाही.” समोर आलेल्या वृत्तांनुसार, हा सिनेमा या वर्षाअखेरीस पडद्यावर दिसेल.

सतीश कौशिक सध्या कागज या सिनेमाच्या रॅपअप मध्ये व्यस्त आहे. या सिनेमाची निर्माती सलमान खान करणार आहे. सध्या सलमान खान त्याचा आगामी सिनेमा भारत च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Loading...
You might also like